Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या हायव्होल्टेज सभांची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही निवडणूक प्रचारात सक्रीय झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयोगी आदित्यनाथ यांनी विदर्भातून महाराष्ट्रातील प्रचारसंभांचा धडाका सुरू केला असून पहिल्याच सभेत बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. त्यांच्या या घोषणेवरुन विरोधकांनी महायुतीवर टीका केली आहे.
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांना महाविकास आघाडीचे नेते सर्वधर्म समभाव आणि संविधानाची आठवण करुन देत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक है तो सेफ है ... असा नारा दिला आहे.
योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदींच्या या घोषणेवरूनही राज्यातील निवडणूक प्रचारात राजकारण तापलं आहे. या घोषणेला महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे.
दरम्यान, आज मिरा भाईंदरचे भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच आगमन झालं आहे. येथील सभेत बटेंगे तो कटेंगे हा नारा असलेला टी-शर्ट पाहायला मिळाला.
येथील सभेत एका तरुणाने बटेंगे तो कटेंगे हा नारा लिहिलेला पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. हा युवक व्यासपीठाजवळ बसून घोषणबाजीही करत होता.
भाजप महायुतीच्या प्रचारात बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरुन आता प्रचार व प्रचारही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, या टी-शर्टची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली आहे.