November Grah gochar 2024 : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; शनी, शुक्रसह 3 ग्रहांचं संक्रमण, 3 राशींचं नशीब फळफळणार
नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्र ग्रह 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 3 वाजून 39 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे.
दिवाळीनंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनीच्या मार्गीचा काही राशींच्या जीवनावर शुभ-अशुभ परिणाम होणार आहे.
16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07 वाजून 41 मिनिटांनी ग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. याचा काही राशींवर परिणाम होणार आहे.
26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 08 वाजून 11 मिनिटांनी बुध ग्रह वक्री होणार आहे. 16 डिसेंबरपर्यंत बुध ग्रह याच अवस्थेत राहणार आहे.
28 नोव्हेंबर 2024 रोजी बृहस्पती ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे अनेक राशींना आर्थिक लाभ मिळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात ग्रहांच्या राशी परिवर्तन आणि शनीच्या मार्गी झाल्याने मेष राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होतील. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, सिंह राशीचे लोक ध्येय गाठण्यात यशस्वी होतील. तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)