Education Loan: उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेणार आहात? तर 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या
शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया त्या गोष्टींविषयी सविस्तर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपात्रता - शैक्षणिक कर्ज घेताना तुमचे वय, शिक्षण, तुम्हाला कोणत्या शिक्षणामध्ये कर्ज हवे आहे आणि तुम्हाला कर्ज देणारी संस्था याविषयी पडताळणी करणे आवश्यक आहे.
तसेच तुम्ही ज्या बँकेतून किंवा आर्थिक संस्थेमधून कर्ज घेणार आहात त्याची देखील सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
व्याज दर - तुम्हाला बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याज दराची तुलना करणे आवश्यक आहे.
जिथे तुम्हाला कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळत आहे तिथून तुम्ही कर्ज घेणे फायदेशीर ठरु शकते.
कर्जाची रक्कम - तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम ठरवणे फायदेशीर ठरु शकते. कर्जाची रक्कम ठरवताना तुमच्यी शिक्षणाचा खर्च, तुमच्या राहण्याचा खर्च यांसारख्या खर्चांचा विचार करा.
कर्ज परतफेड करण्याचा कालावधी - काही बँकांकडून तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक कालावधी देण्यात येतो. तसेच तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा देखील पर्याय तुम्हाला मिळू शकतो.
योजना - सरकारकडून शैक्षणिक कर्जांसाठी अनेक प्रकारच्या योजना आकारण्यात येतात. त्यामुळे तुम्ही या योजनांचा लाभ घेतला तर तुमची कर्जाची रक्कम कमी होऊ शकते.
कागदपत्रं - कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागपत्रांची आवश्यकता असते. तुमचे ओळखीचे प्रमाणपत्र, तुमच्या पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र आवश्यक असते.