Choice of Students : इंजिनीअरिंगची ही शाखा विद्यार्थ्यांची पहिली पसंती, जाणून घ्या टॉप 5 मध्ये कोणत्या शाखांचा समावेश !
ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशनने (एआयएसएचई) २०२१-२२ या वर्षाचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार २०२१-२२ मध्ये उच्च शिक्षणासाठी नावनोंदणीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउच्च शिक्षणासाठी २०२०-२१ मध्ये ४.१४ कोटी नोंदणी झाली होती. 2014-15 मध्ये 3.42 कोटी नोंदणी झाली होती, ती 2021-22 मध्ये वाढून 4.33 कोटी झाली आहे.(Photo Credit : pexels )
ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन २०२१-२२ नुसार उच्च शिक्षणासाठी भारतात सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात आहेत. या अहवालानुसार उत्तर प्रदेशात ८ हजार ३७५ महाविद्यालये आहेत. (Photo Credit : pexels )
गेल्या वर्षी हा आकडा ८,११४ होता. त्याखालोखाल महाराष्ट्र आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. भारतातील महाविद्यालयांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या दहा राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. प्रत्येक लाख लोकसंख्येमागे किमान ३० किंवा त्याहून अधिक महाविद्यालये आहेत.(Photo Credit : pexels )
ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशननुसार, २०२१-२२ मध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची सर्वाधिक क्रेझ आहे. त्याचबरोबर संगणक अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशात गेल्या तीन वर्षांत सुमारे ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Photo Credit : pexels )
२०१९-२० मध्ये संगणक अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ९.३ लाख होती. २०२१-२२ मध्ये ती वाढून १२ लाख झाली. अभियांत्रिकीच्या पहिल्या पाच शाखांमध्ये संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, सिव्हिल अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी यांचा समावेश आहे.(Photo Credit : pexels )
बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये (बीए) प्रवेश घेतलेल्या १.१३ कोटी विद्यार्थ्यांपैकी ५१ टक्के विद्यार्थिनी आणि ४९ टक्के पुरुष आहेत. विज्ञान शाखेत एकूण ४९.१८ लाख विद्यार्थी असून, त्यापैकी ५०.८ टक्के महिला आणि ४९.२ टक्के पुरुष आहेत.(Photo Credit : pexels )
वाणिज्य शाखेत पुरुष ५२.८ टक्के आणि महिला ४७.२ टक्क्यांसह आघाडीवर आहेत. वाणिज्य शाखेत एकूण ४४.०८ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )