Santosh Deshmukh Case: हातपाय तोडा, पण मला मुलांसाठी जगू द्या रे...; संतोष देशमुखांची विनवणी, पण आरोपी मारतच राहिले!

Santosh Deshmukh Case Marathi News: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रूरता त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीवेळेचे फोटोतून दिसून येते. हे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन रिपोर्टमधील माहिती एबीपी माझ्याच्या हाती लागली आहे.

संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हळहळ करून मारले गेले याची कल्पना समोर आलेल्या फोटोंमधून जाणवते.
संतोष देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. मारहाणीमुळे त्यांचं अंग काळे निळे पडले होते. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण सुरू होती.
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने एक धक्कादायक माहिती सांगितली आहे.
माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते हातपाय तोडा, पण गाव, मुलांसाठी जगू द्या, अशी विनवणी करत होते, असं वैभवी देशमुखने सांगितले. तसेच संतोष देशमुखांचे हे शेवटचे वाक्य होते.
बाबांच्या (संतोष देशमुखांच्या) विनवणीनंतरही आरोपींनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले, असं वैभवी देशमुख म्हणाली.
माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे...असं वैभवीच्या जवाबातील संतोष देशमुख यांचे वाक्य असल्यचंही समोर आलं आहे.
आरोपी मारहाण करताना हासत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. कुठल्यातरी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं अशक्य नाही, असंही वैभवी देशमुख म्हणाली.