Eknath Shinde: महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् अयोध्येत झळकले बॅनर; एकनाथ शिंदेंसाठी रामभक्त सरसावले!
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
याचदरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अयोध्येत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
आयोध्या वासियोंकी है, पुकार एकनाथ शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार...असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.
अयोध्यामधील रहिवाशांनी एकनाथ शिंदेंचे हे बॅनर लावल्याचे समोर येत आहे.
23 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.
एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहे.
तसेच आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांच्या मौनाचे नेमके काय कारण हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.