Year Ender 2022 Share Market: शेअर बाजारातील 'या' सेक्टर्स गुंतवणूकदारांना केले मालामाल
निफ्टी ऑटो सेक्टर सध्या 12424.40 अंकांच्या आसपास ट्रेड करत आहे. निफ्टी ऑटोमध्ये एका वर्षात 15.41 टक्क्यांची वाढ दिसून आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिफ्टी बँक सेक्टरमध्ये एका वर्षात 19.54 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीने काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठला होता.
निफ्टी एनर्जी सेक्टरमध्येही तेजी दिसून आली. एका वर्षात10.14 टक्क्यांनी हा सेक्टर वधारला.
Nifty Financial Services सेक्टरमध्ये एका वर्षात 9.66 टक्क्यांची वाढ दिसून आली.
Nifty FMCG सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. एका वर्षात या सेक्टरमध्ये 20.05 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
Nifty IT सेक्टरसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. या सेक्टरमध्ये एका वर्षात 25.16 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
Nifty Media सेक्टरमध्येही गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. एका वर्षात 15.04 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
Nifty Metal सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. एका वर्षात या सेक्टरमध्ये 13.39 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.
Nifty Pharma मध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला नाही. मागील एका वर्षात 5.24 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
Nifty Reality मध्येही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घसरण दिसून आली. Nifty Reality मध्ये 14.13 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.