Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. वारी एनर्जीच्या शेअरमध्ये 5 टक्के तेजी पाहायला मिळाली. वारी एनर्जीचा शेअर दुपारी 12.15 वाजता 1794.45 रुपयांवर पोहोचला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिल्यानं वारी एनर्जीचा शेअर आजच्या दिवसात 71.15 रुपयांनी वाढल्यानं अप्पर सर्किट लागलं.
वारी रिन्यूएबलला 1233 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ग्राऊंड माऊंट सोलर पॉवर प्रोजेक्टच्या इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शनच्या निर्मितीचं काम मिळालं आहे. या प्रकल्पाची क्षमता 2012.47 मेगावॅट डीसी आहे.
वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीजचा नफा 53.51 कोटी रुपयांनी वाढला आहे. कंपनीचा उत्पन्न 527.86 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षात 59678 टक्के वाढ झाली आहे. 29 सप्टेंबर 2019 ला 2.50 रुपयांवर असलेला शेअर आज 1494.45 रुपयांवर आहे.