आयपीओची पुन्हा जादू! एका झटक्यात लोकांचे पैसे झाले दीडपट; वारी एनर्जीने अशी काय कमाल केली?
Waaree Energies IPO Listing: सोलर पॅनल तयार करणाऱ्या Waaree Energies ही कंपनी शेवटी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. या कंपनीच्या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कंपनीचा आयपीओ आला तेव्हा एका शेअरचा किंमत पट्टा 1,427 ते 1,503 होता. दरम्यान याच कंपनीचा शेअर आता 70 टक्क्यांच्या प्रिमियमसह शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला आहे.
Waaree Energies Share BSE वर 70 टक्क्यांच्या प्रिमियमसह 2,550 रुपयांवर लिस्ट झाला आहे. NSE वर हा शेअर 66.3 टक्क्यांच्या प्रिमियमसह 2500 रुपयांवर सूचिबद्ध झाला आहे. काही वेळानंतर हाच शेअर एनएसईवर 72.98 टक्क्यांपर्यंत वाढून 2,600 रुपयांवर पोहोचला आहे.
वारी एनर्जीजचा आयपीओ साधारण 76.34 पटीने सबस्क्राईब झाला होता. या आयपीओच्या माध्यमातून वारी एनर्जीजला 4,321.44 कोटी रुपये उभे करायचे होते.
आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 2,10,79,384 शेअर्स विकणार होती. प्रत्यक्ष तब्बल 1,60,91,61,741 शेअर्ससाठी बोली लागली होती.
सांकेतिक फोटो