मुलतानी मातीची चोली आणि खादी लेहेंगा... सोनमने दिवाळीपूर्वी शेअर केला खास लूक!
बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता.
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर अनेकदा तिच्या अनोख्या आणि स्टायलिश फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर सोनमने तिच्या पारंपरिक अवताराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सोनमने कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनवलेल्या चोलीसह खादीचा लेहेंगा परिधान केला आहे.
तिची ही चोली कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनलेली आहे, जी खरोखरच एक अद्वितीय आणि प्रभावी फॅशन वाटत आहे.
सोनमने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला खादीचा लेहेंगा घातला आहे
या ड्रेससह, अभिनेत्रीने तिच्या हातावर मेहंदी लावली आहे, मिनिमल मेकअप केला आहे आणि हेवी दागिन्यांमध्ये ती आश्चर्यकारक दिसत आहे.