IPO Update : पाच दिवसांत 3 आयपीओंचा धमाका! गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा तयार; जाणून घ्या, प्राईस बँड किती?
पुढचा आठवडा अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. या आठवड्यात एकूण तीन नवे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या 19 नोव्हेंबरपासून एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा एकूण 10,000 कोटी रुपयांचा आयपीओ आहे. कंपनीने आयपीओचा किंमत पट्टा 102-108 रुपये ठेवला आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. तुम्हाला या आयपीओसाठी कमीत कमी 138 शेअर्ससाठी बोली लावावी लागणार आहे.
याच आठवड्यात लॅमोसेक इंडिया हा एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी हा आयपीओ खुला होईल. 26 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल.
हा आयपीओ एकूण 61 कोटी रुपयांचा आहे. कंपनीने आयपीओसाठी 200 रुपयांचा किंमत पट्टा ठेवला आहे.
C2C अॅडव्हान्सड सिस्टम्स या कंपनीचाही आयपीओ 22 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओत तुम्ही 26 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकाल. या आयपीओचा किंमत पट्टा 214-226 रुपये प्रति शेअर आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो