6 IPO अन् शेवटचा दिवस, पैसे कमवण्याची शेवटची संधी अजिबात सोडू नका!
येत्या सोमवारी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी एकूण 6 आयपीओंत गुंतवणुकीची मुदत संपणार आहे. म्हणजेच या सहा आयपीओंत पैसे गुंतवण्याची 23 डिसेंबर हा एकमेव दिवश शिल्लक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील पहिल्या आयपीओचे नाव Transrail Lighting असे आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 410 रुपये ते 432 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलेला आहे. सध्या या आयपीओच्या प्रत्येक शेअरचे ग्रे मार्केटमधील मूल्य 175 रुपये आहे.
DAM Capital Advisors या आयपीओतही येत्या 23 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेअरचा किंमत पट्टा 269 रुपये ते 283 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरचे मूल्य 160 रुपये आहे.
Mamata Machinery IPO मध्ये 23 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी या कंपनीने आपल्या शेअरचा किंमत पट्टा 230 रुपये ते 243 रुपये प्रति शेअर असा निश्चित केलेला आहे. या कंपनीचा शेअर ग्रे मार्केटवर 260 रुपयांवर ट्रेड करतोय.
Sanathan Textiles Limited IPO मध्ये तुम्हाला 23 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. या कंपनीच्या शेअरचा किंमत पट्टा 305 रुपये ते 321 रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आलाय. या कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 40 रुपयांवर ट्रेड करतोय.
Newmalayalam Steel Limited IPO मध्येही तुम्हाला 23 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. त्यासाठी कंपनीने 85 रुपये ते 90 रुपये प्रति शेअर असं किंमत पट्टा निश्चित केला आहे. सध्या हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 30 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करतोय.
Concord Enviro Systems Limited आयपीओतही तुम्हाला 23 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 665 रुपये ते 771 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. सध्या हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 40 रुपयांवर ट्रेड करतोय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
image 9