टाटा ग्रुपच्या 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय, भविष्यात शेअरमध्ये वाढ होणार?
Tata Group Stock: टाटा उद्योग समूहाच्या टायटन (Titan Company) या कंपनीबाबत नवी माहिती समोर येत आहे. ही कंपनी आपल्या तनिष्क या ज्वेलरी ब्रँडचा आंतराष्ट्रीय बाजारात आणखी विस्तार करण्याच्या विचारात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचाच एक भाग म्हणून ही कंपनी आपल्या तनिष्क (Tanishq) या ज्वेलरी ब्रँडला बांगलादशमध्ये लॉन्च करणार आहे.
एक्सचेंज फाइलिंगनुसार त्यासाठी शुक्रवारी तनिष्कने रिदम ग्रुप (Rhythm Group) सोबत एक संयुक्त करार केला आहे.
टाटा उद्योग समूहाचा तनिष्क हा ब्रँड आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवेगळ्या देशात विस्तारलेला आहे. सध्या या ब्रँडचे संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, कतार, सिंगापूर, ओमान या देशात 17 स्टोअर आहेत.
तनिष्कने ज्या रिदम ग्रुपसोतब करार केलेला आहे, ती बांगलादेशमधील एक प्रसिद्ध कंपनी आहे.
देशी वस्त्रनिर्मिती करण्यासाठी 1972 मध्ये या रिदम ग्रुपची स्थापना करण्यात आली होती. सध्या या कंपनीचा विस्तार अनेक क्षेत्रांत आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)