Ashadhi Wari 2024 : तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान; 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, पाहा फोटो
तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे.
हडपसर मार्गे पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.
पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरातून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे.
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.
पुणे शहरातून प्रस्थान ठेवल्यावर तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.
पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या नादात आणि चिपळ्यांच्या सुरांवर ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष होत आहे.
पालखीला सुंदर फुलांनी सजवलं गेलं आहे.
राज्यभरातील भाविक पालखी दर्शनासाठी पुण्यात उपस्थित झाले आहेत.
हडपसर मार्गे पालखी पंढरपूरकडे कूच करणार आहे.