IPO Update : शेअर बाजारात 6 आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी, कोणता IPO सर्वाधिक रिटर्न देणार?
डिसेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात 20 कंपन्यांचे आयीपओ आले. 19 ते 23 डिसेंबरमध्ये दरम्यान 6 कंपन्यांचे आयपीओ आले होते. आज हे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. या सर्व आयपीओच्या शेअरचं अलॉटमेंट झालेलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appममता मशिनरीचा आयपीओ 194.95 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं 179.39 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओचा किंमतपट्टा 230-243 रुपयांदरम्यान होता. जीएमपी 255 रुपयांवर असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास 105 टक्के परतावा मिळू शकतो.
डीएएम कॅपिटल अॅडव्हाजर्स लिमिटेडच्या आयपीओला 81.88 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. याचा किंमतपट्टा 269-283 रुपयांदरम्यान होता. सध्या जीएमपी 145 रुपयांवर असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना 51 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.840.25 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी IPO आणला गेला होता.
ट्रान्सरेल लायटिंगचा आयपीओ 838.91 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. हा आयपीओ 82 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओचा किंमतपट्टा 432 रुपये होता. आयपीओचा जीएमपी 167 रुपये असून त्यानुसार लिस्टींग झाल्यास 38 टक्के परतावा मिळू शकतो.
सनातन टेक्स्टाइल्स या कंपनीच्या आयपीओला 35.12 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. कंपनीनं हा आयपीओ 550 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला होता. कंपनीचा जीएमपी 87 रुपयांवर असून त्यानुसार लिस्टींग झाल्यास 28 टक्के परतावा मिळू शकतो.कॉनकार्ड एनवायरो सिस्टीम्सचा आयपीओ 10.67 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं आयपीओ 500 कोटींच्या उभारणीसाठी आणला होता. या आयीपओचा जीएमपी 134 रुपयांवर असून त्यानुसार लिस्टींग झाल्यास 20 टक्के परतावा मिळू शकतो.
न्यूमलायम स्टील कंपनीचा एसएमई आयपीओ एनएसएईवर लिस् होईल. या आयपीओचा जीएमपी 30 रुपयांवर असून 34 टक्के प्रीमियमवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)