Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
गेल्या काही दिवसांपासून एशियन हॉटेल्स (नॉर्थ )कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. हॉटेल कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचे शेअर 351.05 रुपयांवर होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएशियन हॉटेल (नॉर्थ) कंपनीच्या शेअरला गेल्या आठ दिवसांपासून अप्पर सर्किट लागत आहे. कंपनीचा शेअर बुधवारी 334.35 रुपयांवर बंद झाला होता. आज या कंपनीचा शेअर 52 आठवड्यामधील उच्चांकावर पोहोचला आहे.
एशियन हॉटेल (नॉर्थ)च्या शेअरमध्ये गेल्या 10 सत्रात 80 टक्क्यांची वाढ झाली आहे. 18 डिसेंबरला या कंपनीचा शेअर 188.55 रुपयांवर होता. आज या कंपनीचा शेअर 351.05 रुपयांवर आहे.
जानेवारी 2018 मध्ये यां कंपनीचा शेअर 318.45 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 5 फेब्रुवारी 2007 मध्ये या कंपनीचा शेअर 899.50 रुपयांवर होता.
एशियन हॉटेल(नॉर्थ) कंपनीचा शेअर गेल्या तीन वर्षात 397 टक्क्यांनी वाढला आहे. 31 डिसेंबरला 2021 ला या कंपनीचा शेअर 70.55 रुपयांवर होता. 2 जानेवारी 2025 ला शेअर 351.05 रुपयांवर आहे. गेल्या 10 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 167 टक्के वाढ झाली आहे. 1 मार्च 2024 ला शेअर 131.40 रुपयांवर होते. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)