15 दिवसांसाठी 'या' बेस्ट स्टॉक्समध्ये गुंतवा अन् मिळवा भरघोस परतावा!

Axis Direct top 5 stocks Pick: ब्रोकरेज हाउस ॲक्सिस डायरेक्टने (Axis Direct) गुंतवणुकीसाठी 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी 5 ते 15 दिवासांचा विचार करून स्टॉपलॉस, टार्गेट आदी माहिती ॲक्सिस डायरेक्टने दिली आहे. यामध्ये HUDCO, Vinati Organics, Varun Beverages, Thirumalai Chemicals, HFCL या शेअर्सचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Axis Direct ने HUDCO हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी टार्गेट 358 रुपये तर स्टॉपलॉस 312 ठेवायला हवे असे ॲक्सिस डायरेक्टने म्हटले आहे. हा शेअर खरेदी करण्यासाठी प्राइस रेंज 317- 321 ठेवायला हवी, असा सल्ला ॲक्सिस डायरेक्टने दिला आहे.

Axis Direct ने Vinati Organics या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर खरेदी करताना 2,074 रुपयांचे टार्गेट तर 1,975 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिली आहे. हा शेअर खरेदी करण्यासाठी इन्ट्री प्राइस रेंज 1,988 - 2,008 असायला हवी.
Axis Direct ने Varun Beverages हा शेअरदेखील खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी 1,745 रुपयांचे टार्गेट तर 1,585 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा, असे ॲक्सिस डायरेक्टने म्हटले आहे. हा शेअर खरेदी करताना एन्ट्री प्राइस रेंज 1,606- 1,631 असायला हवी.
Axis Direct ने Thirumalai Chemicals या कंपनीचे शेअरही खरेदी करावेत, असा सल्ला दिला आहे. हा शेअर खरेदी करताना 379 रुपयांचे टार्गेट ठेवावे तर 323 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा. तसेच हा शेअर खरेदी करताना एन्ट्री प्राइस रेंज 333 - 337 असावी, असेही या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे.
ॲक्सिस डायरेक्टने HFCL या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 135 रुपयांचे टार्गेट तर स्टॉपलॉस 118.50 रुपये ठेवावेत असे ॲक्सिस डायरेक्टने म्हटले आहे. हा शेअर खरेदी करताना एन्ट्री प्राइस रेंज 120- 121.50 रुपये असावी, असाही ॲक्सिस डायरेक्टने दिलाय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो