Marathi Serial Updates Gharoghari Matichya Chuli : सोनेरी रंगाची साडी, मोत्याचे दागिने अन् मंगळसूत्रासारखं ब्रेसलेट; ऋषिकेश-जानकीच्या लग्नातल्या लूकने वेधलं लक्ष

Marathi Serial Updates Gharoghari Matichya Chuli : जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातलाय.

मेहंदी, हळद आणि संगीत थाटात पार पडल्यानंतर आता ऋषिकेश-जानकीच्या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.

1/9
स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऋषिकेश-जानकीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
2/9
मेहंदी, हळद आणि संगीत थाटात पार पडल्यानंतर आता विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.
3/9
जानकी-ऋषिकेशने लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला पसंती दिली आहे.
4/9
सोनेरी रंगाची साडी आणि मोत्याचे दागिने परिधान करत जानकी वधूच्या रुपात नटलीय.
5/9
तर तिकडे ऋषिकेशच्या सोनेरी रंगाच्या पेहरावाने लक्ष वेधून घेतले आहे.
6/9
जानकीसाठी खास मोत्याचं मंगळसूत्रही डिझाईन करण्यात आलं आहे.
7/9
विशेष म्हणजे ऋषिकेशने जानकीच्या नावाचं अगदी मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट घातले आहे.
8/9
विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, ‘गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे. आम्हा कलाकारांसोबतच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे. प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात.
9/9
आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचचे कौतुक असून जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल असेही तिने सांगितले.
Sponsored Links by Taboola