IPO: रियल्टी फर्म सिग्नेचर ग्लोबलचा आयपीओ येणार, सेबीने दिली मंजुरी; जाणून घ्या सविस्तर माहिती
मागील काही महिन्यात शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ आणला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरियल्टी क्षेत्रातील सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येणार आहे. सेबीने कंपनीला 1000 कोटींचा निधी उभारण्यासाठी परवानगी दिली आहे.
सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडने जुलै महिन्यात सेबीकडे दस्ताऐवज जमा केले होते.
सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड ही मुख्यत: परवडणारी घरे आणि मिड-हाउसिंग सेगमेंटमध्ये कार्यरत आहे.
आयपीओद्वारे कंपनीकडून 750 कोटींचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत.
त्याशिवाय कंपनीकडून प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडून 250 कोटी रुपये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभे करणार आहेत.
आयपीओतून मिळणाऱ्या निधीतून कंपनी कर्जाची परतफेड, जमीन खरेदी आणि व्यावसायिक कारणांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.
त्याशिवाय या निधीतून सिग्नेचर फर्मची उपकंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे.
सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडची वर्ष 2021-22 मध्ये एकूण उत्पन्न 939.6 कोटी रुपये इतके होते. मागील आर्थिक वर्षात 154.7 कोटी रुपये इतके होते.
कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मागील एक दशकापेक्षाही कमी कालावधीत 31 मार्च 2022 पर्यंत 23,453 निवासी आणि व्यावसायिक गाळे विक्री केली आहे. हे सर्व दिल्ली-एनसीआर भागात विक्री केली आहे.