गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, शेअर बाजारात चार IPO आयपीओ लिस्ट होणार, एका आयपीओचा जीएमपी 630 रुपयांवर
वेंटीव हॉस्पिटलिटी लिमिटेडचा आयपीओ 30 डिसेंबर म्हणजेच उद्या लिस्ट होणार आहे. 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान या आयपीओसाठी बोली लावण्यात आली. 26 डिसेंबरला शेअर अलॉट करण्यात आले. तर, ज्यांना आयपीओ अलॉट झाला नाही त्यांना 27 डिसेंबरपासून पैसे परत देण्यात आले. हा आयपीओ 10.34 पट सबस्क्राइब केला आहे. आयपीओचा किंमतपट्टा 610-643 रुपये आहे.तर जीएमपी 70 रुपयांवर पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेडचा आयपीओ देखील उद्या लिस्ट होत आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 372-391 रुपयांवर होता. जीएमपी 57.54 टक्क्यांवर पोहोचला असून प्रतिशेअर गुंतवणूकदारांना 225 रुपये अधिक मिळतील.
यूनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्यूफॅक्चरिंग लिमिटेडचा आयपीओ 184.34 पट सबस्क्राइब झाला आहे. 650 रुपये जीएमपीवर दिसून येत आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 745-785 पट आहे.
कारराव इंडियाचा आयपी देखील उद्या लिस्ट होणार आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 668-704 रुपये निश्चित करण्यात आलं होतं. आयपीओला नफा पण नाही तोटा पण नाही अशी स्थिती आहे.
दरम्यान, इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ 29 डिसेंबरला खुला होणार आहे. या याचा जीएमपी 80 रुपयांवर आहे. म्हणजेच 37.21 परिणाम दिसून येत आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं शेअर मार्केट गुंतवणूक सल्ल्गार वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?