सरकारची 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना करणार मालामाल? एका वर्षात दिलेत 67 टक्क्यांनी रिटर्न्स
मुंबई : मंगळवरी शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. या सत्रादरम्यान ओएनजीसी या कंपनीच्या शेअरमध्ये साधारण चार टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्राअखेर या कंपनीचा शेअर 273.55 रुपयांवर स्थिरावला. ऑईल अँड नॅच्यूरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओएनजीसी ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे. अनेक ब्रोकरेज फर्म्सने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जेफरीज या ब्रोकरेज फर्मनुसार आगामी काळात ही कंपनी 50 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकते. जेफरीजनुसार सरकारच्या धोरणामुळे आगामी काळात या कंपनीच्या नफ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढू शकते. तसा अंदाज व्यक्त केला जातोय.
चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. निकालाच्या दिवशी शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण दिसले. परिणामी हा शेअर थेट 236 रुपयांपर्यंत घसरला होता. मात्र जेफरीजच्या म्हणण्यानुसार आगामी काळात हा शेअर चांगले उड्डाण घेऊ शकतो.
जेफरीजच्या म्हणण्यानुसार या शेअरमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी 390 रुपये टार्गेट ठेवायला हवे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत या कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीने आपल्या कर्जाचा डोंगर सातत्याने कमी केला आहे.
गेल्या एका वर्षात ओएनजीसी या कंपनीने गुंतवणूकदारांना 67 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)