आता 'हे' शेअर पाडणार पैशांचा पाऊस? टाटा आणि अदाणी उद्योग समूहांच्या कंपन्यांचाही समावेश!
भांडवली बाजाराने आज चांगली सुरवात केली. सोमवारी सत्र सुरु झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये साधारण 0.65 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर बाजारातील ही तेजी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटलने काही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये अदाणी आमि टाटा उद्योग समूहाच्या काही शेअर्सचा समावेश आहे.
टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील या स्टॉकला खरेदी करण्याचा सल्ला अरिहंत कॅपिटल या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. या कंपनीत गुंतवणूक करताना 190 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे, असे अरिहंत कॅपिटलने म्हटले आहे. सध्या या शेअरचे मूल्य 154 रुपये आहे. आगामी काळात हा शेअर साधारण 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
अदाणी उद्योग समूहातील अदाणी इंटरप्राझेस या शेअरमध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला अरिहंत कॅपिटल्सने दिला आहे. सध्या या शेअरचे मूल्य 3,069 रुपये आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करताना अरिंहंत कॅपिटल्सने 3,292 रुपयांचे टार्गेट दिले आहे. म्हणजेच हा शेअर आगामी काळात 7 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊ शकतो.
भारत डायनॅमिक्स या शेअरमध्येही गुंतवणुकीचा सल्ला देत अरिहंत कॅपिटल्सने 1,430 रुपयांचे टार्गेट दिलेले आहे. आज सत्राच्या सुरुवातीला या शेअरचे मूल्य शेयर 1,317 रुपये होते. म्हणजेच हा शेअर आगामी काळात 8.50 टक्क्यांनी वाढू शकतो.
भारत डायनॅमिक्स या शेअरने 2024 साली आतापर्यंत 53 टक्क्यांचे रिटर्न्स दिलेले आहेत. या वर्षी आतापर्यंत टाटा स्टीलने10.40 टक्के तर अदाणी इंटरप्रायझेसने 5.31 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)