Demat Accounts: शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार वाढले; डिमॅट अकाउंटची संख्या 10 कोटींवर
भारतीय शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार वाढले आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोविडपूर्व काळात 40.9 दशलक्ष म्हणजे चार कोटींच्या आसपास काही डिमॅट खाते होते. सध्या या डिमॅट खात्यांची संख्या 10 कोटींहून अधिक झाली आहे.
देशात पहिल्यांदाच डिमॅट खात्यांची संख्या 10 कोटींहून अधिक झाली आहे. ऑगस्ट महिन्यात डिमॅट अकाउंटने 10 कोटींचा आकडा गाठला आहे.
ही नवीन डिमॅट खाती कोरोना महासाथीच्या काळात वाढली आहेत.
कोरोना महासाथीच्या आधी देशात डिमॅट खात्याची संख्या 4 कोटींच्या आसपास होती. आता हा आकडा 10 कोटी झाला आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये देशात 22 लाख डिमॅट खाते सुरू करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे.
भारतीय शेअर बाजारात अनेकांची रुची वाढत असल्याचे हे निर्देश आहे असे समजले जात आहे. उत्पन्नाचा दुसरा पर्याय म्हणून अनेकांनी शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला आहे.
कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले होते. त्याशिवाय, वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याने अनेकांनी त्याचा फायदा घेत शेअर बाजारात व्यवहार करण्यास सुरुवात केली.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी, ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते अनिवार्य आहेत. ऑगस्ट महिन्यात CDSL कडे जवळपास सव्वा सात कोटी डिमॅट खाती होती.