आगामी आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'या' दिग्गज कंपन्यांचे शेअर्स होणार एक्स डिव्हिडेंड!
Ex-Dividend Stocks: या आठवड्यात अनेक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंट होणार आहेत. यामध्ये टाटा, बाजाज या उद्योग समूहांच्याही शेअर्सचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिव्हिडेंडच्या मदतीने पैसे कमवण्याच्या शोधात असणाऱ्यांना हा आठवडा चांगला ठरू शकतो. कारण या आठवड्यात अनेक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून चांगली कमाई करता येऊ शकते.
24 जूनपासून चालू होणाऱ्या नव्या आठवड्यात टाटा समूहाचा टायटन, व्होल्टास, बजाज होल्डिंग्स अँड इन्वेस्टमेंट, इंडसइंड बँक, बँक ऑफ बडोदा, आरईसी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
सोमवारी ओबेरॉय रिअॅलिटी या कंपनीचा शेअर एक्स डिव्हिडेंट होणार आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना 2 रुपये प्रति शेअर प्रमाणे डव्हिडेंड देत आहे.
मंगळवारी अल्काइल अमाइन्स केमिकल्स (10 रुपये), भारत पॅरेंटेरल्स (1 रुपये), सेरा सॅनिटरीवेअर (60 रुपये), फिल्ट्रा कन्सल्टटंस् (3 रुपये), अॅटाटा लक्सी (70 रुपये) आणि व्होल्टास लिमिटेड (5.5 रुपये) या कंपन्यांचे शेअर्स एक्स डिव्हिडेंट होतील.
बुधवारी अॅजिस लॉजिस्टिक्स (2 रुपये) आणि वेलस्पन लिव्हिंग (0.1 रुपये) या कंपन्यांचे शेअर्स एख्स डिव्हिडेंट होतील.
गुरुवारी सुप्रीम पेट्रोकॅम, टायटन कंपनीचे शेअर्स एक्स डिव्हिडेंट होतील. या कंपनीच्या शेअरहोल्डर्सना 7 रुपये आणि 11 रुपये प्रति शेअरच्या दराने डिव्हिडेंड मिळेल.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एअरोफ्लेक्स (0.25 रुपये), बजाज होल्डिंग्स (21 रुपये), बँक ऑफ बडोदा (7.6 रुपये), जीआयसी हाउसिंग फायानान्स (4.5 रुपये), इंडसइंड बँक (16.5 रुपये), महाराष्ट्र स्कूटर्स (60 रुपये) या कंपन्यांचे शेअर्स एक्स डिव्हिडेंड होतील.
यासह कल्पतरु प्रोजेक्ट्स (4.5 रुपये), मवाना शुगर्स (4 रुपये), निप्पॉन लाईफ इंडिया एएमसी (11 रुपये), आरईसी (16 रुपये), स्वराज इजिन्स (95 रुपये) आणि वेलस्पन कॉर्प्स (5 रुपये) या शेअर्सचाही यात समावेश आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)