Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात आज खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अनेक शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत, ज्याचा फटका संपूर्ण शेअर बाजाराला बसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.
अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स साधार 10 ते 20 टक्क्यांनी घसरले आहेत, ज्याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसणार आहे. अदानी उद्योग समूहाच्या कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले? पाहूया.
अदानी एनर्जी सोल्यूशन्स - 20 टक्के घसरण
अदानी ग्रीन एनर्जी - 18.93 टक्के
अदानी एन्टरप्राईजेस - 15 टक्के
अदानी टोटल गॅस - 14.70 टक्के
अदानी पॉवर - 14.53 टक्के
अदानी विल्मर - 10 टक्के
अदानी पोर्ट्स - 10 टक्के