Rupee Vs Dollar: चिंता वाढणार? डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉलरच्या तुलनेत रुपयाची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 च्या पातळीवर पोहोचू शकतो असं बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
'रॉयटर्स'ने केलेल्या एका सर्वेक्षणातून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
देशांतर्गत व्यापार संतुलन आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ यामुळे गेल्या नऊ वर्षांतील सर्वात मोठी घसरण रुपयात झाली आहे.
'रॉयटर्स' च्या सर्वेक्षणात 14 बँकर्स आणि विदेशी चलन तज्ञांनी सर्वेक्षणात अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आक्रमक वाढ केली आहे.
फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे डॉलरचा निर्देशांक 18 टक्क्यांनी वधारला आहे.
रुपया कमकुवत झाल्याने परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. रुपयाची होणारी घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री करण्यात येते. त्यामुळे परकीय गंगाजळ कमी होते.
रुपया कमकुवत झाल्याने आयात महाग होते. त्याचा थेट परिणाम येथील सर्वसामान्यांवर होतो.