Tax Saving Scheme: कर सवलतही आणि चांगला परतावादेखील; 'या' योजनेत करा गुंतवणूक

सध्या सुरू असलेले आर्थिक वर्ष संपण्याआधी तुम्हाला गुंतवणुकीबाबत योग्य नियोजन करावे लागेल.

Tax Saving Scheme: कर सवलतही आणि चांगला परतावादेखील; 'या' योजनेत करा गुंतवणूक

1/10
ज्या व्यक्तींचा पगार कराच्या कक्षेत येतो त्यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक नियोजन करणे आवश्यक आहे.
2/10
जर तुम्ही देखील कर बचत योजना शोधत असाल तर त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो.
3/10
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम ELSS या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.
4/10
यामध्ये आयकर कायद्याच्या 80 सी नुसार, दीड लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांची SIP करून गुंतवणूक करू शकता. दरवर्षी सरासरी 10 ते 12 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.
5/10
EPF मध्ये गुंतवणूक केल्यास नोकरदार वर्गाला चांगला परतावा मिळू शकतो. आयकरातही तुम्हाला सवलत मिळते.
6/10
सध्या EPF वर तुम्हाला 8.1 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळतो. 80 सी नुसार 1.5 लाखापर्यंत कर सवलतीचा लाभ आहे.
7/10
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही पोस्ट ऑफिसची लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे.
8/10
यामध्ये तुम्ही किमान एक हजार रुपयांहून अधिकाधिक कितीही गुंतवणूक करू शकता. आयकर कायद्यातील 80 सी नुसार, तुम्हाला कर सवलत मिळू शकते.
9/10
स्टेट बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास 6.10 टक्के व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के इतका व्याज दर मिळतो. या गुंतवणूक योजनेत पाच वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत कर सवलत मिळू शकते.
10/10
आरोग्य विमा योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्यातील 80 डी नुसार, कर सवलत मिळू शकते.
Sponsored Links by Taboola