Health Insurance Claim: 'या' कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इंशोरन्स क्लेम; कसा? ते जाणून घ्या...
Health Insurance Claim: आज आम्ही तुम्हाला इंश्योरन्स क्लेम रिजेक्ट होण्याची काही कारणं सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेल्थ एमरजन्सी उद्भवल्यानंतर हेल्थ इंशोरन्स खूपच फायदेशीर ठरतो. कारण हेल्थ इंशोरन्समुळे उपचारांसाठी लागणारा खर्चाचा बोजा हलका होण्यास मदत होते.
परंतु, अनेक वेळा हेल्थ इंशोरन्स घेतल्यानंतरही क्लेम रिजेक्ट केला जातो.
क्लेम रिजेक्ट झाल्यामुळे मोठी पंचायत होते. हेल्थ इंशोरन्सचा क्लेम रिजेक्ट झाल्यानंतर उपचारासाठीची मोठी रक्कम उभी करावी लागते. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पॉलिसी घेताना कोणत्या चुका टाळायला हव्यात....
अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करताना वय, उत्पन्न किंवा इतर मेडिकल पॉलिसीबाबत चुकीची माहिती देतात. यामुळे कंपन्या हेल्थ इंशोरन्सचा क्लेम रिजेक्ट करतात.
हेल्थ इंशोरन्स क्लेम रिजेक्ट होण्यमागे मुख्य कारण आहे, आधीपासूनच असलेल्या आजारांबाबत योग्य माहिती न देणं. अनेकजण हेल्थ इंशोरन्स काढताना आधीपासूनच असलेल्या आजारांबाबत माहिती देणं टाळतात. नंतर अनेक कंपन्या इंशोरन्स क्लेम रिजेक्ट करतात.
प्रत्येक हेल्थ इंशोरन्स पॉलिसीचा एक वेटिंग पीरियड असतो. अशातच या पीरियडमध्ये इंशोरन्स क्लेम केला, तर त्यावेळी तुमचा क्लेम रिजेक्ट केला जातो.
जर तुम्ही प्रीमियम वेळेत भरला नसेल तर अशा परिस्थितीत हेल्थ इंशोरन्स क्लेम रिजेक्ट केला जातो.
प्रत्येक हेल्थ इंशोरन्स पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी एक वेळ ठरलेली असते. या वेळेनंतर क्लेम केल्यानंतर कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकते.