Tax Saving Tips: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक अन् मिळवा कर वजावटीचा फायदा
तुम्हाला चांगल्या परताव्यासह कर वजावटीचा फायदा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजना फायदेशीर ठरू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिसच्या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.
तुम्हीदेखील या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यातील कलम 80 सी नुसार 1.5 लाख रुपयांची कर सवलत मिळू शकते.
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला १५ वर्षांनंतर चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के दराने परतावा मिळू शकतो.
नॅशनल सेव्हिंग स्कीमध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. यामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत कर वजावटीचा लाभ मिळू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या नावाने 10 वर्ष गुंतवणूक करू शकता. याममध्ये दीड लाखापर्यंत वार्षिक गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने परतावा मिळू शकतो.
पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजनेत तुम्हाला आयकर कायद्यातील 80 सी कलमनुसार 1.5 लाख रुपयापर्यंतची सवलत मिळू शकते.