हॅलो हॅलो हॅलो....! डिजिटलच्या दुनियेतही नेटवर्क नसलेले गावं; पाहा फोटो
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सिंगारवाडी या गावातील लोकांना आजही मोबाईल नेटवर्कसाठी (Mobile Network) डोंगराकडे धाव घ्यावी लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण या गावात कोणत्याच कंपनीच्या सिमकार्डला रेंज मिळत नाही. त्यामुळे महत्वाचा फोन करायचा असल्यास गावकरी थेट डोंगराची वाट धरतात.
'लो दुनिया करलो मुठ्ठी मे' म्हणत आज अनेक मोबाईल कंपन्या बाजारात सेवा देण्यासाठी उतरल्या आहेत.
शहरापासून गाव, खेडा आणि तांड्यावर देखील सहज मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क केला जातो. त्यामुळे मोबाईल नेटवर्कमुळे जग जवळ आले.
या डिजिटल जगात माणसांनी एवढी प्रगती केली आहे की, चक्क चंद्र व विविध ग्रहांवर यान सोडले जाताहेत. पण, चंद्रावरच्या गप्पा सुरु असताना आजही अशी अनेक गावे आहेत, जिथे साधे तंत्रज्ञानही पोहोचले नाही.
कारण राज्यातील वेगवेगळ्या भागात आजही अनेक गावात साधे मोबाईल नेटवर्कही उपलब्ध नाही.
नांदेड जिल्ह्यातील अदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट तालुक्यातील अनेक गावात अजूनही मोबाईलला नेटवर्कच नाही.
अतिशय डोंगराळ भागात वसलेलं सिंगारवाडी हे गाव अजूनही जगाच्या संपर्कात नाहीय. या गावात कोणत्याच कंपनीचे मोबाईल टॉवर नाही.
मोबाईल टॉवर नसल्याने इंटरनेटची सुविधाच नाही. मोबाईल असून नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना उंच टेकडीवर किंवा झाडावर जाऊन नेटवर्कच्या संपर्कात यावं लागत.
नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतय. त्यामुळे, मोबाईल टॉवर उभारून देण्याची मागणी गावकरी करत आहेत.