PPF Withdrawal Rules : पीपीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? कसं ते जाणून घ्या...
PPF योजना लोकप्रिय सरकारी योजनांपैकी एक आहे. ही एक करमुक्त योजना आहे. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. (Image Source : istock)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना सरकारद्वारे चालवली जाणारी उत्तम दीर्घकालीन बचत योजना आहे. (Image Source : istock)
पीपीएफ योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळते. (Image Source : istock)
सध्या सरकार जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के व्याजदराचा लाभ देते. यामध्ये तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षात एका वर्षात 500 ते 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. (Image Source : istock)
अनेक वेळा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते, अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खात्यातून मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढू शकता. (Image Source : istock)
मॅच्युरिटी पूर्वी पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पीपीएफ खातेधारक 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातून पैसे काढू शकतात. (Image Source : istock)
पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकता. (Image Source : istock)
आपत्कालीन परिस्थितीत पीपीएफ खात्यातून मुदतपूर्व पैसे काढता येतात. मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, वैद्यकीय आणीबाणी इत्यादी खर्च भागवण्यासाठी तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता. (Image Source : istock)
पीपीएफ खात्यातून मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी, तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. (Image Source : istock)