PNB ग्राहकांना देतेय आर्थिक मदत; फक्त 'या' नंबरवर मिस कॉल द्या, खात्यात येतील पैसे!
PNB Loan : पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खातं असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचेही बँकेत खातं असेल आणि तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकेकडून आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल. जाणून घ्या सविस्तर...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या कर्जांबाबत (Bank Loan) ऑफर देते. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. याच्या मदतीनं नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय देखील सुरू करता येतो.
पीएनबी (PNB) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केलं आहे. बँकेनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, जर तुम्ही 9 ते 5 ची नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला फक्त मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारे कर्ज मिळू शकतं.
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) कर्ज सुविधेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.pnbindia.in/loans.html या लिंकला भेट देऊ शकता.
बँकेकडून ग्राहकांना विविध प्रकारची कर्ज दिली जातात. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, एमएसएमई (MSME) कर्ज आणि कृषी कर्जाचा समावेश आहे.
कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँकेच्या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्हाला 1800-180-2222 किंवा 1800-103-2222 वर कॉल करावा लागेल.
येथे ग्राहकांना कर्जाशी निगडीत सर्व माहिती मिळते. याव्यतिरिक्त मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएममार्फत कर्जासाठी अप्लाय करता येऊ शकतं.
याव्यतिरिक्त तुम्ही मिस्ड कॉलमार्फत कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेचा टोल फ्री नंबर 1800-180-5555 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. येथे तुम्हाला कर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.