आपत्कालीन परिस्थितीत PF चे पैसे तात्काळ काढता येतात का? अर्ज कसा कराल? वाचा
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि नोकरदारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ फंड योजना चालवते,यामुळे दर महिन्याला पगारातून काही रक्कम कापून तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही रक्कम तुमच्या सेवानिवृत्तीच्या वेळी जमा होते जेणेकरून तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतं.पण एक प्रश्न डोकावतो तो आपण EPFO मधून कधीही पैसे काढू शकतो का?
कोरोना काळात सरकारने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांना ईपीएफओ सुविधा जारी केली होती, ज्या अंतर्गत कोणीही त्यांच्या पीएफ खात्यातून कधीही पैसे काढू शकतो.
येथे सदस्य तपशील पाहता येतील. आता पडताळणी करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक त्यात भरा. आणि 'होय'वर क्लिक करा. यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण करून पैसे काढू शकता.
वेबसाइटवर जाऊन तुम्हाला उजव्या बाजूला UAN आणि पासवर्डचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तपशील टाकून आणि कॅप्चा भरून लॉगिन करावे लागेल.
उघडलेल्या पेजवर तुम्हाला पृष्ठाच्या उजव्या बाजूला असलेल्या ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करावे लागेल आणि ड्रॉप-डाउन सूचीमधून फॉर्म (फॉर्म-31,19,10C आणि 10D) निवडा.