सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्री, अभिनयाला 'राम-राम' करत बनली 1300 कोटींच्या कंपनीची मालकीण
अलिकडच्या काळात काही सेलिब्रिटींनी अभिनय क्षेत्राला राम-राम करत बिझनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. ही अभिनेत्री सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्री आहे.(PC : aashkagoradia/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक सेलिब्रिटी बिझनेस करुन कोट्यवधी रुपये कमावतात. आज टीव्ही इंडस्ट्रीतील श्रीमंत अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या, जी एकेकाळी छोटा पडदा गाजवत होती. (PC : aashkagoradia/instagram)
या अभिनेत्रीने खलनायिका बनून प्रत्येक घरात आणि प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आणि ती आता टीव्ही इंडस्ट्रीला बाय-बाय करत स्वत:चा व्यवसाय सुरु करुन त्यातून कोट्यवधींची उलाढाल करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे आशका गरोडिया.(PC : aashkagoradia/instagram)
अभिनेत्री आशका गरोडिया हे टीव्ही जगतातील प्रसिद्ध नाव आहे. आशका गरोडियाने अनेक मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका उत्तम प्रकारे साकारली. त्यानंतर आशका अचानक छोट्या पडद्यावरुन गायब झाली. तिने अभिनय क्षेत्र सोडून व्यवसाय क्षेत्रात भरपूर यश मिळवलं आहे.(PC : aashkagoradia/instagram)
आशका गरोडिया सध्या 1300 कोटींचा व्यवसाय सांभाळत आहे. आशका गरोडिया अनेक टीव्ही शोंमध्ये झळकली आहे. तिने 2002 मध्ये अभिनय क्षेत्रातील करियरला सुरुवात केली आणि त्यानंतर 2019 मध्ये टीव्ही इंडस्ट्री कायमची सोडली. त्यानंतर तिने व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. (PC : aashkagoradia/instagram)
आशका गरोडियाने 2002 मध्ये 'अचानक 37 साल बाद' या टीव्ही मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. तिने बहुतेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत.(PC : aashkagoradia/instagram)
यानंतर ती 'कुसुम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहीं तो होगा', 'सिंदूर तेरे नाम का', 'विरुद्ध', 'सात फेरे', 'लागी तुझसे लगन' आणि 'भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप' यासारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली.(PC : aashkagoradia/instagram)
17 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीत काम केल्यानंतर तिने ब्युटी व्यवसायात पाऊल ठेवलं. आशकाने तिच्या दोन मित्रांसोबत मिळून 2018 मध्ये 'रेने कॉस्मेटिक्स' कंपनीची सुरुवात केली. ही कंपनी सध्या कोट्यवधींची उलाढाल करते.(PC : aashkagoradia/instagram)
'रेने कॉस्मेटिक्स' सध्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. (PC : aashkagoradia/instagram)
रेने कंपनीचे प्रोडक्ट्स लोकांच्या पसंतीस उतरले आणि या कंपनीची उलाढाल कोट्यवधींपर्यंत पोहोचली.(PC : aashkagoradia/instagram)
Entrackr च्या रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत 'रेने' या कॉस्मेटिक्स ब्रँडची किंमत 1300 रुपये झाली आहे.(PC : aashkagoradia/instagram)
आज आशका गरोडिया एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिने शून्यातून सुरु केलेला हा व्यवसायत खूप यशस्वी झाला आहे.(PC : aashkagoradia/instagram)