LIC ची 'ही' पॉलिसी ठरते मुलांसाठी फायदेशीर, मॅच्युरिटीनंतर लाखोंचा परतावा
अपत्य झाल्यानंर पालकांवरील जबाबदारी वाढते. त्याचं संगोपन, त्याचं भविष्य यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आजच्या काळात मुलांच्या जन्मासोबतच खर्चाची मोठी यादी तयार केली जाते. मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर त्यांच्या लग्नाचा खर्च या सर्व गोष्टींमध्ये लाखो रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत मुलं लहान असल्यापासूनच त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन सुरू करायला हवं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजही देशातील मध्यमवर्ग देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीत गुंतवणूक करायला प्राधान्य देतो. LIC ची 'जीवन तरुण योजना' ही अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करु शकता. तुम्हालाही LIC च्या जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर जाणून घ्या या योजनेच्या खास गोष्टी जाणून घ्या.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एलआयसी जीवन तरुण योजना विशेषत: मुलांच्या गरजांनुसार डिझाइन करण्यात आली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना, सहभागी योजना आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला डेथ बेनिफिट आणि बचत दोन्हीचा लाभ मिळतो.
तुम्ही या योजनेत मुलांसाठी जास्तीत जास्त 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही ही पॉलिसी मुलाच्या वयाच्या पहिल्या वर्षी घेतली, तर ती तो 25 वर्षांच्या वयात आल्यावर मॅच्युअर होईल. जर तुम्ही ही पॉलिसी मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षी खरेदी केली, तर तुम्हाला हा परतावा 15 वर्षांनंतर मिळेल.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलाचं वय किमान 90 दिवस ते 12 वर्ष असावं. या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, मूल 20 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. यानंतर, त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला सर्व पैसे मिळतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला 125 टक्के सम अॅश्युअर्ड बेनिफिट मिळेल.
पॉलिसी खरेदी केल्यानंतर पालकांचा मृत्यू झाला, तर मुलाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. मूल 25 वर्षांचं झाल्यानंतर, त्याला पूर्ण परतावा मिळेल.
जर एखाद्या पालकानं मूल जन्माला आल्यानंतर LIC तरुण पॉलिसी खरेदी केली तर त्यांना दररोज 150 रुपये गुंतवावे लागतील. दर महिन्याला तुम्हाला 4,500 आणि वार्षिक 54,000 रुपये गुंतवावे लागतील. 25 वर्षांनंतर, तुम्हाला सुमारे 26 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल.
तुम्ही या योजनेत दरमहा, तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरात गुंतवणूक करू शकता. या योजनेत, गुंतवणूकदाराला 75,000 रुपयांची विमा रक्कम मिळेल.