Investment Tips: सात रुपयांची बचत देईल तुम्हाला 5000 रुपयांची पेन्शन
सरकारकडून नागरिकांसाठी विविध बचत योजना चालवण्यात येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटल पेन्शन योजना ही लोकप्रिय योजना आहे. या योजनेत तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
18 ते 40 या वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
अटल पेन्शन योजना PFRDA कडून चालवण्यात येते. देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ही पेन्शन योजना आहे.
या बचत योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस अथवा बँकेत बचत खाते हवे.
या योजनेअंतर्गत पाच पेन्शन स्लॅब आहेत - एक हजार रुपये, दोन हजार रुपये, तीन हजार रुपये, चार हजार रुपये आणि पाच हजार रुपये.
जेव्हा संबंधित व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा सरकार त्याला निवडलेल्या पेन्शन स्लॅब नुसार पेन्शन देते.
संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पेन्शन दिली जाते. या योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.
गुंतवणुकीची रक्कम ग्राहकांच्या वयावर अवलंबून असते, म्हणजेच तुम्ही तरुण वयात योजनेत भाग घेतल्यास, तुम्ही अल्प रकमेमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन सुनिश्चित करू शकता.