Bank FD करण्यापूर्वी जाणून घ्या सध्याचे दर; कोणत्या बँकेत किती व्याजदर?
Bank FD Rates : आजही गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, मुदत ठेव (Fixed Deposit). FD मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. याशिवाय एफडीमध्ये बँकेकडून ग्राहकांना व्याजाची सुविधा दिली जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर कोणती बँक किती दराने व्याज देते...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) : युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकांना एफडीवर 5.4 टक्के दरानं व्याज देते.
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 5 वर्षांच्या एफडीवर 5.3 टक्क्यांनी व्याज देते.
पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank) : पंजाब अँड सिंध बँक FD वर 5.3 टक्क्यांनी व्याज देते.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडीवर 5.25 टक्के दरानं व्याज देते.
कॅनरा बँक : कॅनरा बँक ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडीवर 5.25 टक्के दरानं व्याज देते.
आरबीएल बँक (RBL Bank) : आरबीएल बँक Fixed Deposit वर ग्राहकांना 6.30 टक्के दरानं व्याज देते.
येस बँक (Yes Bank) : याव्यतिरिक्त येस बँक एफडी केल्यानंतर ग्राहकांना 6.25 टक्के व्याज देतं.