जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशांची यादी समोर, पहिल्या चारमध्ये कोणते देश? भारतावर किती कर्ज?
यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या देशाचं नाव वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. जीडीपीच्या तब्बल 216 टक्के कर्ज जपानवर आहे. जपानचा यामध्ये पहिला क्रम लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या स्थानावर ग्रीसचा क्रमांक लागतो. ग्रीसवर त्यांच्या जीडीपीच्या 203 टक्के कर्ज आहे. म्हणजेच ग्रीसवर जीडीपीच्या दुप्पट कर्ज आहे. ग्रीस आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
जीडीपीच्या तुलनेत अधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर यूनायटेड किंग्डमचं नाव येतं. यूकेवर जीडीपीच्या 142 टक्के कर्ज आहे. चौथ्या स्थानावर लेबनॉनचं नाव येतं. लेबनॉनवर जीडीपीच्या 128 टक्के कर्ज आहे. हा देश युद्धाच्या संकटाला तोंड देत आहे.
यानंतर पाचव्या देशाचं नाव स्पेनचं आहे. स्पेनवर जीडीपीच्या 111 टक्के कर्ज आहे. स्पेनला रशिया यूक्रेन युद्ध आणि करोनानंतर निर्माण झालेल्या अर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
या पाच देशांशिवाय भारताचा विचार केला असता भारत जगातील वेगानं विकसित होणार देश आहे. भारतावर जीडीपीच्या 46 टक्के कर्ज आहे.