शेअरची किंमत फक्त 4 रुपये, पण अनेकांनी गुंतवले पैसे; तुम्ही पण होणार मालामाल?
GTL Infrastructure Limited share: सध्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या पेनी स्टॉककडे सगळ्यांची नजर आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरला अफर सर्किट लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्रवारी हा शेअर 4.15 रुपयांवर पोहोचला. ऑगस्ट 2023 मध्ये हा शेअर 0.70 पैशांवर होता.
या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नाचा अभ्यास करायचा झालाल्यास त्यात एकूण 3.28 टक्के हिस्सेदारी प्रमोटर्सजवळ आहे. पब्लिक शेयरहोल्डर्सजवळ 96.72 टक्के मालकी आहे.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) या भारतातील सर्वांत मोठ्या विमा कंपनीनेही जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. या कंपनीची 3.33 टक्के मालकी ही एलआयसीकडे आहे.
यासह यूनियन बँक ऑफ इंडियाजवळ 12.07 सेंट्रल बैंक ऑफ इंडियाजवळ 7.36 टक्के, बँक ऑफ बडोदाकडे 5.68 टक्के हिस्सेदार आहे.
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही एक टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी हाय नेटवर्क आणि अपटाईमसाठी ओळखली जाते. मार्चच्या तिमाहीच्या निकालाचा अभ्यास करायचा झाल्यास या कंपनीचा एकूण व्यापार 331.1 कोटी रुपयांचा आहे. या कंपनीला मार्चच्या तिमाहीत 214.7 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)