Income Tax : केवळ एका रुपयाच्या अधिकच्या उत्पन्नामुळे बसणार 25 हजारांचा फटका
कर रचनेबाबत अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेनंतर करदात्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) सात लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याची घोषणा केली.
प्राप्तिकराच्या सवलतीवरून करदात्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कर रचनेवरून काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागल्या आहेत.
नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपैकी 3 लाख रुपयांवर कोणताही कर लागणार नाही. उर्वरित चार लाखांवर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार आयकर भरावा लागेल.
पहिल्या 3 लाख रुपयांच्या पगारावर तुम्हाला 5 टक्के कर भरावा लागेल. याचाच अर्थ 15000 रुपये आणि उर्वरित 1 लाख रुपयांवर तुम्हाला 10 टक्के दराने 10000 रुपये कर भरावा लागेल. म्हणजेच 700001 रुपये पगारावर तुम्हाला 25000 रुपये (15000+10000) आयकर भरावा लागेल.
नव्या कर प्रणालीनुसार, जर तुमचे उत्पन्न 7 लाख रुपये असल्यास तुम्हाला एक पैसाही कर भरावा लागणार नाही.
जर, तुमचा पगार, उत्पन्न सात लाखाहून अधिक असल्यास तुम्हाला 3,00,001 ते सहा लाख रुपयापर्यंतचा 5 टक्क्यांचा कर लागू होईल. 6,00,001 ते 9 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागू शकतो.
जर, तुमचा पगार सात लाखांपेक्षा एक रुपयांहून अधिक असल्यास तुम्हाला 87 ए चा लाभ मिळणार नाही.