नवा आयपीओ आला रे! 13 नोव्हेंबरपासून पैसे गुंतवता येणार; जाणून घ्या प्राईस बँड किती, एका लॉटमध्ये किती शेअर्स?
Zinka Logistics Solutions IPO Price Band: येत्या 13 नोव्हेंबर रोजी झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आह. या आयपीओचा किंमत पट्टा 259-273 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुंतवणूकदारांना 18 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे.
या कंपनीच्या आयपीओत एका लॉटमध्ये एकूण 54 शेअर्स असतील. हा आयपीओ एकूण 1114.72 कोटी रुपयांचा असेल. ही कंपनी एकूण 550 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर देणार आहे.
झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स ही कंपनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी ट्रक इंडस्ट्रीमध्ये काम करते. या कंपनीची स्थापना 2015 साली झाली होती.
येत्या 21 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर लिस्ट होणार आहे. यशस्वी गुंतवणूकदारांना 19 नोव्हेंबर रोजी शेअर्सचे वाटले जातील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो