Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक फार आळशी असतात. प्रत्येक कामाचा त्यांना कंटाळा आलेला असतो. सगळी कामं ते हळूहळू कासव गतीने करतात, म्हणूनच हुशार असूनही ते नेहमी मागे पडतात.

Numerology mulank 7

1/10
अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 च्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
2/10
मूलांक 7 चे लोक थोडे आळशी असतात, ते प्रत्येक काम कासवगतीने करतात. 7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक आळशी असले तरी ते डोक्याने मात्र स्मार्ट असतात. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
3/10
7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक हे अतिशय संथ असतात. रेंगाळत सगळी कामं करण्याची सवय त्यांना असते. प्रत्येक कामाचा त्यांना आळस आलेला असतो, म्हणूनच ते प्रगतीच्या वाटेवर मागे पडतात.
4/10
हे लोक हुशार असतात, परंतु त्यांच्या कामातील संथ गतीमुळे यश त्यांच्याकडे लवकर चालून येत नाही.
5/10
यशाची पायरी चढायला यांना काहीसा वेळ लागतो. एका जागेवर उठणं देखील यांच्या जीवावर येतं. ते एका जागेवर बसले की एका जागेवरच बसतात आणि तिथूनच सर्व कामं पूर्ण करतात.
6/10
आजचं काम उद्यावर टाकण्याची सवय त्यांना असते, त्यांच्या या स्वभावामुळे कधी-कधी हातात आलेल्या चांगल्या संधीही त्यांच्याकडून निसटून जातात.
7/10
मूलांक 7 चे लोक आळशी असतात. आराम करायला एखादी जागा मिळाली तर ते तिथेच रेंगाळत राहतात. परंतु एकदा घराबाहेर पडले की हे लोक लगेच अॅक्टिव्ह होतात. नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करणं यांना आवडतं. 
8/10
हे लोक बौद्धिकदृष्ट्या खूप हुशार असतात, प्रत्येक गोष्ट त्यांच्या चटकन लक्षात येते.
9/10
मूलांक 7 चे लोक अभ्यासात देखील हुशार असतात. कमी अभ्यास करुन देखील ते परीक्षेत चांगले गुण मिळवतात.
10/10
प्रेम आणि मैत्रीमध्ये या लोकांची अनेकदा फसवणूक होते. या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola