Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?

Toss The Coin या कंपनीचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओचा जीएमपी 109 टक्क्यांवर पोहोचला आहे. या कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 9.17 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टॉस दी क्वाइन कंपनी आयपीओच्या माध्यमातून 5.04 लाख शेअर जारी करणार आहे. आयपीओ 12 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील.

हा आयपीओ एसएमई प्रकारातील आहे. एका समभागाचं मूल्य 172 रुपये ते 182 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. एका लॉटमध्ये 600 शेअर असतील. त्यानुसार गुंतवणूकदाराला किमान 1,09,200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनीकडून शेअरची अलॉटमेंट 13 डिसेंबरला केली जाणार आहे. तर, शेअर बाजारात हा आयपीओ 17 डिसेंबरला लिस्ट होईल.
ग्रे मार्केट मध्ये या कंपनीचा शेअर 200 रुपयांच्या जीएमपीवर असल्याची माहिती आहे. जीएमपीनुसार या आयपीओचं लिस्टींग झाल्यास 382 रुपये एका शेअरला मिळू शकतात.
अँकर इनवेस्टर्ससाठी आयपीओ 9 डिसेंबरला खुला झाला होता. या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कंपनीनं 2.60 कोटी रुपयांची उभारणी केली. आयपीओत 35 टक्के कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेला आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)