SEBI : आयपीओ लिस्ट होण्यापूर्वी ट्रेडिंग करता येणार, सेबीचं गुंतवणूकदारांना गिफ्ट, लवकरच मोठा निर्णय घेणार
सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी काल (21 जानेवारी) रोजी एका कार्यक्रमात आयपीओ लिस्ट होण्यापूर्वी त्याच्या शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचं नियोजन करत असल्याचं म्हटलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीओ बोली लावण्यास बंद झाल्यानंतर शेअर अलॉट झाल्यानंतर ते लिस्टींग होईपर्यंत गुंतवणूकदारांची संबंधित कंपनीच्या शेअरला पसंती असते. या काळात त्यांना ट्रेडिंग करायचं असल्यास कायदेशीरपणे त्यांना असं करण्याची परवानगी दिली पाहिजे, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या.
आयपीओचे शेअर अलॉट झाल्यानंतर ते स्टॉक मार्केटवर तो लिस्ट होईपर्यंत ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु असतं.शेअर अलॉट झाल्यापासून लिस्ट होण्यापर्यंतच्या काळात ज्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म बनवण्याची गरज आहे. जिथं नियमानुसार ट्रेडिंग होईल.
आयपीओचे शेअर अलॉट केल्यानंतर संबंधित गुंतवणूकदार त्याचा मालक बनतो. मात्र, लिस्टिंगपर्यंत ते शेअर डीमॅट खात्यात फ्रीज केलेले असतात. कारण, अनलिस्टेड शेअरचं ट्रेडिंग होऊ नये नव्या यंत्रणेत शेअर खात्यात ट्रान्सफर झाल्यापासून लिस्टिंगपर्यंत ट्रेडिंगची परवानगी दिली जाईल.
ग्रे मार्केटमध्ये होणाऱ्या ट्रेडिंगला नियंत्रित करण्यासाठी सेबीकडून ही पावलं उचलली जातील. गेल्या काही वर्षात आयपीओच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ग्रे मार्केट हे अनधिकृत आणि अनियंत्रित मार्केट आहे. जिथं आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री होते, ते सेबीच्या नियमाबाहेर होतं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)