खुशखबर! आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी आला, पैसे कमवण्याची चांगली संधी, जाणून घ्या एका शेअरची प्राईज किती?
Lamosaic India या दिग्गज कंपनीचा आयपीओ येत्या 21 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओत संपूर्ण फ्रेश शेअर्स असणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. एकूण 61.20 कोटी रुपयांचा हा आयपीओ असेल.
कंपनी गुंतवणूकदारांना 27 नोव्हेंबर रोजी शेअरचे वाटप करणार आहे. ही कंपनी एनएसई एसएमई (NSE SME) वर सूचिबद्ध होणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. या कंपनीच्या आयपीओचा किंमत पट्टा 200 रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे.
हा एक एसएमई सेगमेंटाच आयपीओ असून एका लॉटमध्ये 600 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच तुम्हाला आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याडे कमीत कमी 120000 रुपये असणे गरेजेच आहे.
ही कंपनी मुंबईत फ्लश डोर्स, डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स, प्रींटिंग पेपर आणि प्लायवूड तयार करते. 2023 रोजी आपले उत्पादन चालू केले होते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो