Shiv Jayanti Wishes 2025 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शिवभक्तांना द्या खास शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस
शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे... जय शिवराय!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा, एकच होता असा राजा, नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवरुन मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग... देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!