Apex Ecotech IPO : अॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अॅपेक्स इकोटेक एसएमई आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओला सबस्क्राइब करण्यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.कंपनीचा यामाध्यमातून 25.54 कोटी रुपयांची कमाई करण्याचा प्रयत्न आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅपेक्स इकोटेक एसएमई आयपीओद्वारे 34.99 लाख इक्विटी शेअर जारी करणार आहे. एका शेअरची किंमत 73 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
इनवेस्टर गेन डॉट कॉम नुसार अॅपेक्स इकोटेक एसएमई आयपीओच्या शेअर ग्रे मार्केटवर 35 रुपयांच्या प्रीमियमसह 108 रुपयांवर दाखवत आहे. यानुसार गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशी 48 टक्क्यांपर्यंत फायदा होऊ शकतो.
अॅपेक्स इकोटेक कंपनी पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनामध्ये काम करते. आयपीओचे शेअर 2 डिसेंबरला अलॉट होतील तर 4 डिसेंबरला लिस्टींग होईल.
अॅपेक्स इकोटेक एसएमई आयपीओचं प्राइस बँड 71 रुपये ते 73 रुपये आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 1600 शेअर मिळतील. त्यासाठी 116800 रुपयांची बोली लावावी लागेल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)