LIC IPO चा ग्रे मार्केटमध्ये दर काय? IPO साठी आज शेवटचा दिवस
एलआयसी आयपीओला पॉलिसीधारक, किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आयपीओसाठी रविवारपर्यंत 1.79 पटीहून अधिक बोली लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी आहे.
पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 5.4 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले आहे. आज शेवटच्या दिवशी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 3.79 पटीने सबस्क्रिप्शन झाले आहे. किरकोळ गुंतवणुकदार गटात 1.59 पटीने सबस्क्रिप्शन केले आहे.
शेअर बाजारात येऊ घातलेल्या आयपीओला ग्रे मार्केट कसा प्रतिसाद देतो, याकडे अनेकांचे लक्ष असते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी शेअर प्रीमियम दर घसरला असल्याचे दिसून आले आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी एलआयसीच्या प्रीमियम शेअर दर हा 85 रुपयांवर होता. आज हा प्रीमियम दर 36 रुपयांवर आला आहे.
रविवारी हा दर 60 रुपयांवर होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीसाठी 92 रुपयांपर्यंत प्रीमियम दर देण्यात आला होता. त्यात आता घसरण होऊन हा हा दर 36 रुपयांवर आला आहे.