SIP Investment Tips : SIP मध्ये गुंतवणूक करताय? मग लक्षात ठेवा 'या' गोष्टी
एसआयपीच्या माध्यमातून भारतातील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. AMFI डेटा दर्शविते की सात वर्षांपूर्वी SIP द्वारे मासिक योगदान रुपये 3 हजार कोटी होते. त्यात आता वाढ झाली असून 16 हजार रुपये प्रति महिना झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसआयपी लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यास मदत करते. याचे अनेक फायदे असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. या कारणास्तव, प्रत्येकाने एसआयपी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
सर्वप्रथम तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा. ही केवळ SIP नाही तर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. तुमचे उद्दिष्ट दीर्घकालीन आहे की अल्पकालीन हे ठरवल्याने गुंतवणुकीचे साधन निवडणे सोपे होईल.
एसआयपी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन केले पाहिजे. तुम्हाला अनेक SIP मध्ये जास्त परतावा मिळू शकतो, पण तिथेही जोखीम जास्त असते. त्याच वेळी, कमी जोखमीच्या योजनांमध्ये परतावा देखील कमी असतो.
SIP पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ जोखीम आणि परतावा संतुलित करण्यास मदत करेल.
कोणत्याही एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी, त्याबाबतची अधिक माहिती घ्यावी. जितकी माहिती घेणे महत्त्वाचे आहे, तितकेच फंड हाऊस तपासणेही महत्त्वाचे आहे.
गुंतवणुकीच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. जेव्हा तुम्ही पूर्ण शिस्तीने नियमितपणे गुंतवणूक करता तेव्हाच SIP प्रभावी ठरते.