Post Office Scheme : दररोज 50 रुपये गुंतवा अन् 35 लाखांचा परतावा मिळवा; काय आहे योजना?
भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office Schemes) अनेक प्रकारच्या बचत योजना चालवतं. कोट्यवधी लोकांना पोस्टाच्या या योजनांचा चांगलाचा फायदा होत असल्याचं दिसत आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन अनेक गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवत आहेत. त्यामुळे लोक पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणं जोखीममुक्त मानलं जातं. लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित आणि उत्तम परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवायचे असतात. अशीच एक पोस्ट ऑफिस योजना म्हणजे, ग्रामसुरक्षा योजना. या योजनेसाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता.
ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Rural Postal Life Insurance Schemes Program) कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही विमा पॉलिसी 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेतंर्गत 10 हजार रुपयांपासून 10 लाखांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
ग्राम सुरक्षा योजनेबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला या योजनेत दरमाह 1,515 रुपये म्हणजेच, दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करायची असेल, तर त्यांना तब्बल 35 लाखांचा परतावा मिळू शकतो.
जर तुम्ही ग्रामसुरक्षा योजना वयाच्या 19व्या वर्षी घेत असाल, तर वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1,515 रुपये प्रीमियम भरावं लागेल.
जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली, तर तुम्हाला दरमहा 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 1411 रुपये द्यावे लागतील. तुमचा एखादा प्रीमियम भरायचा चुकल्यास, तुम्ही तो पुढच्या 30 दिवसांच्या आत जमा करू शकता. जर तुम्ही या योजनेच्या परताव्यावर नजर टाकली तर, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ मिळेल.